मुंबई टाइम्स टीमजगभरात सध्या करोना थैमान घालत आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी दिवसभरात वारंवार हात धुणं गरजेचं आहे. तेही कमीत कमी २० सेकंद हात धुतले गेले पाहिजेत, असं तज्ज्ञ सांगतात. पण वारंवार हात धुतल्यामुळे तुमच्या हाताची त्वचा करोडी पडण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञ सांगतात. कॉस्मेटीक सर्जन आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जयश्री शरद सांगतात की, साबणाने हात धुतल्यामुळे हातावरील मळासोबतच नैसर्गिक तेल देखील कमी होतं. परिणामी, हाताची त्वचा कोरडी पडते. हाताच्या त्वचेचा ओलावा जपला जाईल असा साबण वापरा. साबणामध्ये सोडीयम सल्फेटचं प्रमाण जास्त असल्यास तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. कोरडी त्वचा नकोतुम्हाला जर तुमची त्वचा छान मऊ हवी असेल तर त्याचा ओलावा जपा. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळेस हात धुऊन झाल्यावर मॉइस्चराइजर लावा. तुमच्या मॉइस्चरायझरमध्ये इ जीवनसत्व, बदाम, नारळाचं तेल, सिरॅमिडीस अशी पोषणमूल्य असतील याची काळजी घ्या. डॉ. जयश्री शरद सांगतात की, पाणीयुक्त मॉइस्चराझर वापरणं टाळा. हे करातुम्ही हात धुतल्यानंतर हात थोडे ओलसर असतानाच त्यावर मॉइस्चराइजर लावा, असं डॉ. मोनिका गोगल (त्वचारोग तज्ज्ञ) सांगतात. तुम्ही रात्री झोपताना ग्लोव्हज घालून झोपू शकता. जेणेकरून तुमच्या त्वचेची झालेली हानी भरुन निघेल. कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय ० चार टेबलस्पून बदाम तेल, एक टेबलस्पून गुलाब पाणी आणि अर्धा टेबलस्पून टिनचर बेंझॉइन एकत्र घ्या. मिश्रणामध्ये बेंझॉइन थेंब थेंब घाला. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे हाताला लावून ग्लोव्हज घालून झोपा. सकाळी उठून स्वच्छ पाण्यानं हात धुऊन घ्या. ० बेसन, दूध आणि हळद एकत्र करून घ्या. ही तयार झालेली पेस्ट हातावर लावा आणि २० मिनिटानंतर धुऊन टाका. ० बदाम तेल आणि मध एकसारख्या प्रमाणात घेऊन एकत्र करा. या मिश्रणाचा हाताला छान मसाज करून घ्या. थोड्या वेळानं हात धुऊन टाका.० तुमची नखं कोरडी पडली असती तर गरम व्हेजिटेबल तेलामध्ये दहा मिनिटं हात बुडवून ठेवा. संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट