Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

International Women's Day आयुष्यातील प्रत्येक ‘ती’ला पाठवा जागतिक महिला दिनाच्या खास शुभेच्छा

$
0
0

जागतिक महिला दिन (International womens day) दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. प्रत्येक 'ती'चं आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे-खास आहे, 'ती'नं केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे; अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ‘ती’चा सन्मान करून दिली जाते. तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुमच्या आयुष्यातील महिलांप्रति आदर व्यक्त करणं शक्य नसल्यास त्यांना मेसेजद्वारे छानसा संदेश पाठवा.

१. हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी
Happy Women's Day 2021
(ही तडजोड नकोच!)

२. स्त्री असते एक आई
स्त्री असते एक ताई
स्त्री असते एक पत्नी
स्त्री असते एक मैत्रिण
प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
(पारंपरिकतेला आधुनिक साज)

३. नारी हीच शक्ती आहे नराची...
नारीच हीच शोभा आहे घराची...
तिला द्या आदर, प्रेम, माया...
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

४. स्त्रीमध्ये असते शक्ती अपार,
स्त्री आहे या सृष्टीचा आधार,
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान,
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार...
Happy Women's Day 2021
(खरंच मुक्त आहात का?)

५. जी नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार,
मग तिलाच का केवळ त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
(कसा बदलणार दृष्टिकोन?)

६. जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला,
अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles