हातात फुटलेला बॉम्ब, मोडलेल्या चकल्या, बाबांकडून भरपूर हट्ट करून मिळवलेला नवा ड्रेस, पणत्या, रांगोळ्या.... दिवाळीच्या तीन शब्दांत हे इतकं आणि बरंच काही सामावलेलं आहे. दरवर्षी दिवाळी आली की आठवणींचे हे लड्डू मनातल्या मनात फुटू लागतात. आपसूकच ओठावर गोड हास्याची लकेर येते.
↧