मुंबई टाइम्स टीम
व्हॅलेंटाइन डे आणि त्याला जोडून आलेला वीकेंड यामुळे जोडप्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. त्यात मंगळवारी आणखी एक सार्वजनिक सुट्टी आल्याने, सोमवारी रजा टाकून शनिवार ते मंगळवार असा चार दिवसांचा वीकेंड जोडप्यांना अनायसे मिळणार आहे. या लाँग वीकेंडचा पुरेपूर फायदा उचलायचं कपल्सनी ठरवलं आहे. पर्यटकांचं फेव्हरेट असलेल्या गोव्याला अनेकांनी पसंती दिली असून, तिथे गर्दी होणार आहे. त्या खालोखाल केरळला जाणाऱ्यांची गर्दी आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुणे यासारख्या शहरांनजिकच्या ठिकाणांचं बुकिंग मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
फिरायला जाणं, हॉटेल बुकिंग अशा अनेक गोष्टी आता ऑनलाइन केल्या जाऊ लागल्या आहेत. मग व्हॅलेंटाइन डेसारखा, कपल्ससाठी खास असलेला दिवस त्याला अपवाद कसा असेल? यंदाही हे चित्र बघायला मिळालं. आजची कपल्स स्मार्ट कपल्स आहेत. सर्वच कामं अॅप्सच्या माध्यमातून करण्याकडे त्यांचा कल असतो. ट्रिप बुकिंगही आता त्यापैकीच एक झालं आहे. आज ३५ ते ४० टक्के ट्रिप्स अॅप्सच्या माध्यमातून बुक केल्या जातात. यात कपल्स ट्रीपचा सर्वात मोठा वाटा आहे. सोप्पा आणि स्मार्ट पर्याय म्हणून तरुणाईने अॅप्सलाच आपला टूर ऑर्गनायझर बनवले आहे.
डेस्टिनेशन ठरवणं, बुकिंग, रिटर्न तिकिट अशा अनेक गोष्टींचं बुकिंग मोबाइल अॅप्सद्वारे केल्या जातायत. 'यंदा मोबाइल अॅपद्वारे आमच्याकडे आलेल्या क्वेरीजचं प्रमाण जवळपास ३० टक्के होतं. याशिवाय या दिवशी झालेल्या एकूण हॉटेल बुकिंगपैकी ४० टक्के बुकिंग हे मोबाइल अॅपमधून झालं. गेल्या वर्षी हे प्रमाण जेमतेम दोन-चार टक्के होतं. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढलेलं असेल', असं 'यात्रा.कॉम' आणि 'ट्रिपफॅक्टरी.कॉम'तर्फे सांगण्यात आलं. यासाठी उपलब्ध असलेल्या मोबाइल अॅप्सवर टाकलेली एक नजर...
अॅप बुकिंगची कारणं टूर प्लॅनिंग व बुकिंगपर्यंतचे अनेक अॅप्सचे पर्याय > अॅप्सचा सोप्पा इंटरफेस > काही क्लिकवर होणारं बुकिंग > उपलब्ध होणारी भरपूर माहिती > तिकीटांपासून ते जेवणखाण्यापर्यंत सर्व काही एकाच जागी बुक करण्याची सोय > हव्या-नको त्या सेवा निवडण्याचा पर्याय > प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन बुकींग करण्यापेक्षा सोपा पर्याय
↧
स्मार्ट फोन, स्मार्ट प्लॅन
↧