Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कॅम्पस क्वीन्स

$
0
0

मृण्मयी पाथरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

फेस्टिवलचं आयोजन करण्यापासून राष्ट्रीय स्तरावरील एखाद्या स्पर्धेत कॉलेजचं प्रतिनिधीत्व करेपर्यंत, सगळीकडे वर्चस्व दिसून येतं ते मुलींचंच. विविध कौशल्यांच्या बळावर कॅम्पस'क्वीन्स' कॉलेजमध्ये आपला ठसा उमटवताना दिसतायत.

'उद्या त्या कंपनीमध्ये जायचंय...सगळी तयारी करून ये. स्पॉन्सरशिपसाठी बोलायचं आहे', 'फेस्टिवलसाठी हीच थीम घेऊया...बघा आम्ही कसं करून दाखवतो ते' हे आणि असे संवाद कॉलेजांमध्ये मुलींच्या तोंडून सहज ऐकू येत असतात. कारण फेस्टिवलच्या आयोजनापासून ते कॉलेजमधल्या कुठल्याही उपक्रमांमध्ये मुली हिरिरीने सहभागी होत आहेत. कोणतंही कॉलेज घ्या, सध्या त्यातल्या क्रीडा स्पर्धांपासून प्रत्येक गोष्टींमध्ये मुली सर्वात पुढे असतात.

कॉलेजचा फेस्टिवल म्हणजे मोठी जबाबदारी असते. फेस्टिवलसाठी संध्याकाळी उशिरापर्यंत कॉलेजमध्ये थांबून ती कामं करून घेण्यात मुली मागे नसतात. फेस्टिवलसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवणं, त्याचं मार्केटिंग करणं, प्रायोजक शोधणं, कार्यकर्त्यांकडून कामं करवून घेणं अशा कित्येक जबाबदाऱ्या आजच्या या कॅम्पसक्वीन्स सहजतेने पार पडताना दिसतायत.

कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या अनेक जबाबदाऱ्या. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात दुवा म्हणून काम करणं हे करण्यात अनेकदा मुलंच आघाडीवर असायची. पण हे चित्रही आता झपाट्याने बदलायला लागलं आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळणाऱ्या मुली जनरल सेक्रेटरी म्हणून काम करताना दिसतायत. जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये स्टुडंट कौन्सिलच्या पॅनेलवर मुलीच दिसतायत.

कॉलेजच्या नियतकालिकासाठी मजकूर संपादन करणं, कॅम्पसमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी काही कल्पना लढवणं, फेस्टमधल्या नाटकात अभिनय-लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळणं, कॉलेजच्या ऑर्केस्ट्रामध्ये गायनाची, वादनाची कला सादर करणं हे मुली प्रभावीपणे करतायत. मुलींशी वादविवादात कुणी जिंकू शकणार नाही असं गमतीत म्हटलं जातं. पण वादविवाद स्पर्धांमध्येही मुली आपला ठसा उमटवतायत. हे सगळं करता-करताच या मुली अभ्यासातही कुठेच मागे नाहीत.

कॉलेजच्या प्लेसमेंटमध्ये नोकरी पटकावणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. केवळ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणंच नव्हे तर समाजकार्य करण्यात त्या मागे नाहीत. कॉलेजतर्फे होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमातही त्या उत्साहाने सहभागी होत असतात. एकंदरीत काय, तर हम किसीसे कम नही असं ठणकावून सांगत कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्टीत मुली पुढे दिसून येतातय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>