Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

रस्ता दाखवणार स्मार्ट शूज

$
0
0

>> स्वप्निल घंगाळे

अंध व्यक्तींसाठी आधार ठरणारी काठी तुम्ही आजपर्यंत पाहिली असेल. पण त्यांना रस्ता दाखवणारे स्मार्ट बूटच आता तयार झाले आहेत. जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी हे बूट तयार केले असून, अंधांसाठी ते वरदान ठरू शकतील.

अंध व्यक्तिंना उपयोगी पडतील अशी सेन्सर ब्लाइंड स्टीक ब्रेल इ रिडर आजवर आली आहेत. पण, अंधांना मार्ग दाखवण्यास उपयुक्त ठरणारे स्मार्ट बूटच तयार करण्यात आले आहेत. ही कामगिरी केलीय आसनगावमधील शिवाजीराव जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी. या बुटांच्या मदतीने, ब्लाइंड स्टिकशिवायही अंध व्यक्तिंना सहज वावरता येऊ शकेल.

'अंध व्यक्तींना उपयोगी पडणारं आणि त्यांना सर्वसामान्यांप्रमाणेच वावरता येऊ शकेल अशी सुविधा देणारं उपकरण आम्हाला तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करायचं होतं. या उद्देशातून आम्ही हे स्मार्ट शूज बनवले', असं हे शूज बनवणाऱ्या टीममधली उदया ही विद्यार्थिनी सांगते. दीपिका मुकणे आणि किशोर जवळकर या प्राध्यापकांच्या मदतीने उदया एम, मिथून पाद्या, विनय सिंग, उन्नती गायकर या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी आठ फिचर्स असणारे हे स्मार्ट शूज तयार केले आहेत. या प्रोजेक्टने भारती विद्यापीठामध्ये झालेल्या टेक स्पर्धेत पहिला तर डी.वाय. पाटील इ‌‌न्स्टिट्यूटमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. हे बूट बनवण्यासाठी पाच हजार रुपये खर्च आला आहे. हे बूट मोठ्या संख्येने तयार केल्यास खर्च कमी होऊ शकतो असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

कसं काम करतात हे शूज?

अंध लोकांसाठी बनवण्यात आलेले हे बूट व्हायब्रेशन्सच्या मदतीने अंधांना मार्ग दाखवतात. या शूजला कमांड देण्यासाठी अँड्रॉइड अॅप बनवण्यात आलं आहे. डावीकडे उजवीकडे अशा व्हॉइज कमांडनुसार हे बूट व्हायब्रेशन्स देतात. या अॅपमध्ये अंध व्यक्तीच्या घरचा पत्ता एकदा फिड करुन ठेवला की जीपीएसच्या मदतीने हे शूज आपोआपच त्याला घरचा रस्ता व्हायब्रेशन्समधून सुचवतात. ज्या दिशेने व्हायब्रेट होणार त्या दिशेला चालत राहायचं इतकं हे सोप्पं आहे. बुटांच्या पुढल्या भागात ऑबस्ट्रॅकल सेन्सर्स आहेत. उंचवटा, खड्डा, अडथळा याचे अॅलर्टही हे शूज देतात. नियोजित रस्ता चुकल्यास पुढच्या बाजूला व्हायब्रेट होऊन पुन्हा नियोजित रस्त्यावर येईपर्यंत हे शूज पुढे व्हायब्रेट होत राहतात.

बुटांतले खास फिचर्स बुटांवर असणारे नॅव्हीगेटर ही व्यक्ती अंध असल्याचं रात्रीच्या वेळी इतरांना कळावं म्हणून एलइडी लाइट्स फ्लॅश. चालल्यामुळे ऑटोमॅटीक चार्ज होणारी बॅटरी. मोबाईल चार्जिंगप्रमाणे चार्ज करण्याची सोय. चलताना प्रीझो प्लेटच्या मदतीने दाबामुळे बॅटरी चार्ज होण्याची सोय. पावलं आणि त्यासाठी किती कॅलरीज वापरल्या गेल्या हे मोजण्याची सोय. आपत्कालीन परिस्थीतीत मदत करणारे पॅनिक फंक्शन. कनेक्टेड अँड्रॉइड अॅप जे व्हाइज कमांडवर चालतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles