वैविध्यपूर्ण विषयांचा कलात्मक अंगानं वेध घेणारी 'हलत्या चित्रांची स्पर्धा' या स्पर्धात्मक उपक्रमातून लघुपटांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. कोथरूड येथील नॅशनल फिल्म अर्काइव्ह इथं येत्या रविवारी (दि. १५) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होत आहे. कल्चर क्लब सभासदांना या कार्यक्रमात मोफत सहभागी होता येणार आहे.
'महाराष्ट्र टाइम्स' आणि आर्क इव्हेंटस् अॅण्ड ऐंटरटेन्मेंट यांच्यातर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात विविध विषयांवरील १५ लघुपटांचं सादरीकरण होणार आहे. हे लघुपट करण्यामागची भूमिका, त्यांचे आशय-विषय, मेकिंग याविषयाची माहिती लघुपटाच्या तंत्रज्ञांकडून जाणून घेता येणार आहे. त्यासाठी संवादाचं सत्रही ठेवण्यात आलं आहे. 'मुंबई पुणे मुंबई', 'लग्न पहावे करून' या सिनेमांचे संकलक राजेश राव तसंच संगीतकार-दिग्दर्शक अजय नाईक या स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित असणार आहेत.
कल्चर क्लबच्या सभासदांना या कार्यक्रमात मोफत प्रवेश आहे. इतरांसाठी पन्नास रुपये शुल्क असणार आहे. कल्चर क्लबच्या सभासदत्व आणि अधिक माहितीसाठी mtcultureclub.com या वेबसाईटला भेट द्या. संपर्क ः ९७६२११५८१४
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट