Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

ऑनलाइन मैत्री

$
0
0

प्रियांका जाधव, भांडूप

मैत्री कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे सांगता येत नाही. एखादी व्यक्ती समोरासमोर भेटूनही आपली त्या व्यक्तीशी मैत्री होत नाही. पण एखाद्या व्यक्तीला न भेटता केवळ त्याच्याशी बोलूनही आपल्यात खूप छान मैत्री होते. माझी आणि महेशची मैत्रीसुद्धा अशीच झाली. साधारण पाच वर्षांपूर्वी एकदा मी ऑनलाइन असताना माझी आणि त्याची मैत्री झाली. तिथेच आम्ही चॅटिंग करू लागलो. कित्येक दिवस आम्ही एकमेकांशी फक्त ऑनलाइन बोलायचो. भेटण्याचा योग बरेच दिवस आला नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की तो ही भांडूपलाच राहतो. अगदी माझ्या घराजवळच. मग आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि एकदा ठरवून भेटलो. भेट झाल्यावर दोघांनाही खूप नवल वाटलं. अर्थात ते स्वाभाविक होतं. इतके दिवस जवळ राहूनही आमची भेट झाली नव्हती. पण नंतर मात्र आम्ही ठरवलं की आता वेळ मिळेल तेव्हा भेटायचं, गप्पा मारायच्या, शेअरिंग करायचं आणि खूप धमाल करायची. भेटू लागलो तशी आमची मैत्रीसुद्धा वाढत गेली. आता तर आमच्यात एवढी छान मैत्री झाली की आम्ही ऑनलाइन भेटलो होतो यावर कोणाचा विश्वासही बसत नाही. एकत्र फिरणं, मस्ती करणं आणि पिझ्झा खाणं हे आमचं ठरलेलं असतं. गेल्या चार वर्षात आम्ही खूप मज्जा केली. पण गेल्या काही दिवसांत तो त्याच्या कामात आणि मी माझ्या कामात बिझी असल्याने फार भेटणं होत नाही. एखाद्या दिवशी ठरवून, वेळ काढून भेटतो आणि खूप गप्पा मारतो. सध्या दोघांचाही फोकस करिअरवर असल्याने कामाला प्राधान्य असतं. पण दोघांमध्ये तेवढा समजुतदारपणा असल्याने आमच्यात फार भांडणं होत नाहीत. आमची ही मैत्री अशीच टिकून राहो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>