Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

खासमखास

$
0
0

मैत्रीला वयाचं भान नसतं असं म्हणतात. माझ्या बाबतीत हा नियम तंतोतंत लागू होतो. कारण माझ्यात आणि माझ्या खास मैत्र‌णिीत जवळपास पंचवीस वर्षांचं अंतर आहे. माझी ही मैत्रीण दुसरी-तिसरी कोणी नसून माझी मुलगी, शिवानी आहे. शिवानी आणि माझ्यात जसं वयाचं अंतर आहे, तसंच विचारांचंसुद्धा अंतर आहे. लहानपणापासूनच ती अत्यंत समंजस आहे आणि मी लगेच रागावणारी. ती शांत आणि मी बडबडी, ती विचार करून निर्णय घेणारी आणि मी बेधडकपणे वागणारी. कदाचित या भिन्न स्वभावांमुळेच आमच्यात एवढी छान मैत्री झाली असावी. मी नोकरी करत असल्याने फार वेळ आम्ही एकत्र नसायचो. पण संध्याकाळी मी ऑफिसमधून आणि ती शाळेतून घरी आल्यावर आम्ही खूप गप्पा मारायचो. शाळेत काय काय झालं, कोण कोणाशी भांडलं, बाईंनी कसं कौतुक केलं हे सगळं ती मला सांगायची. आमच्या ऑफिसमधले गमतीदार किस्से मी तिच्यासोबत शेअर करायचे. त्यामुळे आमच्यातलं नातं अधिक घट्ट होत गेलं. सगळ्या गोष्टी आईशी कशा शेअर करायच्या असा प्रश्न अनेक मुलींना पडतो. पण आई आपली किती चांगली मैत्रीण होऊ शकते हे माझ्या आणि शिवानीच्या नात्यातून आमच्या इतर मैत्रिणींनाही समजलं. शिवानी सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी असते. त्यामुळे पूर्वीइतक्या आमच्या गप्पा होत नाही. पण रोज रात्री आम्ही न चुकता फोनवर बोलतो. शक्य तितक्या गोष्टी एकमेकींना सांगत असतो. मैत्री करताना समोरची व्यक्ती कोण आहे?, ती आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठी आहे, तिचं आणि आपलं नातं काय आहे? या गोष्टींकडे फारसं लक्ष न देता आपण त्या व्यक्तीसोबत किती सुरक्षित आहोत याकडे जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं.

- सुचिता दामले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>