Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

डिजिटलीही संपवा नातं!

$
0
0

संकलन - सुपर्णा शुक्ल

नात संपलं तरी प्रेम उरतंच, वगैरे डायलॉग सिनेमा आणि मालिकांमध्येच शोभून दिसतात. कारण भूतकाळात रमण्याचा सर्वाधिक त्रास तुम्हालाच होऊ शकतो. असं नुकतंच एका संशोधनात सिद्ध झालंय. त्यामुळेच नव्या नात्याची सुरुवात करताना, जुनी नाती डिजिटलीसुद्धा डिलीट करून टाका.

बऱ्याचदा नातं तुटल्यानंतरही अनेकजणी व्हॉट्सअॅपवर जुने फोटोज किंवा फेसबुकवर इमोशनल स्टेटस ठेवून पुन्हा एकदा नातं जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातूनही काही साध्य झालं नाहीच तर चक्क फेक प्रोफाइल बनवून जोडीदाराच्या अकाऊंटवर रोज ऑनलाइन भेट देतात. हे सगळं थांबवायचं किंवा टाळायचं असेल तर त्यासाठी काही खास टिप्स...

जर तुम्ही अजूनही तुमच्या पूर्व प्रियकराचे फोटो बघण्यात किंवा त्यावर त्याच्या मित्रांनी केलेल्या कमेंट्समधून काही अर्थ लावायचा प्रयत्न करत असाल तर ते थांबवा. जर तुम्ही त्यांना अनफ्रेंड करू शकत नसाल तर निदान फेसबुकवरील सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या अकाऊंटमधून येणा‍ऱ्या फोटो आणि माहितीचा ओघ थांबवू शकता. जर तुम्ही इमेल यूजर असाल तर फिल्टर्समध्ये तुमच्या पूर्व प्रियकराचा इमेल आयडी टाका.

फेसबुक अकाऊंटवरील भूतकालीन आठवणी नष्ट करणारी काही अॅपही आता आली आहेत. उदा. किलस्विच अॅप. अशाप्रकारची अॅप वापरून तुम्ही जुने फोटोज, स्टेटस, त्याच्या कमेंट्स आणि तुमच्या वॉलवरच्या त्या पोस्टही डिलीट करू शकता.

नको असणा‍‍ऱ्या नंबरकडून येणारे कॉल ड्रॉप करणारीही अनेक अॅप्स आहेत. त्याचा वापर करा. एक्स लव्हर ब्लॉकर हा तर एक अजून उत्तम पर्याय आहे. एकदा नंबर ब्लॉक केल्यावरही समजा तुम्ही मोह होऊन तुमच्या पूर्व प्रियकराला कॉल करायचा प्रयत्न केलाच तर हे अॅप तुमच्या नियोजित यादीतील मित्रांना एक मेसेज पाठवते. जेणेकरून ते तुम्हाला असं करण्यापासून परावृत्त करू शकतील.

ब्रेकअपनंतर देवदास बनणा‍ऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कधी नशेत किंवा धुंदीत पूर्व प्रियकराला कॉल करण्याचा किंवा सोशल साइटवरून मेसेज पाठवण्याचा वेडेपणा करत असाल तर सोब्रिटी टेस्ट वेबसाइट तुम्हाला मदत करू शकते.(Sobriety Test website) या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला नको असलेल्या सेवा इतकंच नव्हे तर तुमचा मेल आयडी आणि नंबरही ब्लॉक करू शकता. तसंच जर नशेत तुम्ही पूर्व प्रियकराला कॉल लावण्याचा किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न केला तर आधी तुम्हाला काही स्टेप्स पार पाडाव्या लागतात. त्यामुळे तुमची नशा तरी उतरेल नाहीतर तो कॉल तरी लागणार नाही. तुम्ही भानावर याल आणि असं काही करण्यापासून परावृत्त व्हाल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>