asawari.chiplunkar @timesgroup.com
तरुण जोडप्यांना हल्ली लग्न झाल्यावर लगेचच 'चान्स' घ्यायचा नसतो. अॅरेंज मॅरेज असेल, तर पुरेशी ओळख होण्यासाठी आणि लव्ह मॅरेज असेल तरीही इतक्या लवकर जबाबदारी नको म्हणून जोडपी थांबायचा निर्णय घेतात. पण पालक आणि नातेवाईक मात्र त्यांचा पिच्छा पुरवत राहतात.विशेषतः मुलींच्या मागे 'कधी चान्स घेणार?' हे टुमणं असतंच.. कधी यात नव्या जोडप्याचं वय वाढत चालल्याची काळजी असते, तर कधी ही बोलणी चक्क शंकेखोर टोमण्यांच्या स्वरुपात असतात. पण हा जोडप्याचा खासगी निर्णय आहे आणि या कळत्या पिढीला योग्य वाटेल, तेव्हा ते निर्णय घेतीलच, यावर या ज्येष्ठांचा विश्वासच नसतो.
याविषयी नुकतंच अॅरेंज मॅरेज झालेली अश्विनी केळकर-चितळे म्हणाली, 'एकमेकांची नीट ओळख व्हावी, जुळवून घेता यावं आणि शारीरिकप्रमाणेच मानसिकदृष्ट्याही 'चान्स' घेण्याची तयारी आहे का, हे पाहायला हवं. आर्थिक गणितही जुळायला हवं. बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करता येणार असेल तरच चान्स घेण्यात काही अर्थ आहे.' तर विदुला पंडित-कुलकर्णी म्हणाली, ' मुलींनी शक्यतो तिशीच्या आत तरी पहिला 'चान्स' घ्यावाच; तसंच, बाळ आल्यावर आपल्यावर वेळेचीही काही बंधनं येतील, याची मानसिक तयारीही असावी. पालक 'चान्स' घेण्यासाठी मागे लागतात, याचं महत्त्वाचं कारण अनेकदा 'आमचे हातपाय चालतात, तोपर्यंत आम्ही बाळाला सांभाळू' हेही असतं.'
आर्थिक विचारही महत्त्वाचा
हल्ली बाळाचे कपडे, नर्सरी, शाळा, त्याआधी हॉस्पिटलचा खर्च हे दिवसेंदिवस महाग झालंय. तसंच, गरोदरपणानंतर साधारण आठव्या महिन्यापासून मुली ब्रेक घेतात. बाळंतपणानंतरही ३-४ महिने बाळाला सोडून नोकरीवर जाणं कठीणच असतं. मग एकटा नवरा आर्थिक बाजू सांभाळू शकणार आहे का, हेही बघणं महत्त्वाचं ठरतं.
शंकाच जास्त..
लग्नानंतर तीन वर्षांपेक्षा जास्त थांबणाऱ्यांविषयी आजही समाजात शंकाच घेतली जाते. आपल्या मुलांवर कुणी अशी शंका घेऊ नये, या काळजीतून पालकच अनेकदा 'चान्स' घ्याच असा धोशा लावतात. ... हल्ली शिक्षण-नोकरीनिमित्त तरुण अवेळी आणि अयोग्य आहार घेतात. 'चान्स' घेण्यापूर्वी दोन वर्षं तरी या सगळ्यांत बदल करावा. मूळात मुलींनी वयाच्या तिशीतच आणि मुलांनीही ३२ व्या वर्षापर्यंत पहिला चान्स घ्यायलाच हवा. यानंतर तब्येतीच्या बाबतीतली गुंतागुंत निर्माण होऊ शकते. - डॉ. अरविंद संगमनेरकर, गायनॅकॉलॉजिस्ट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट