Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

‘अक्षय’ प्रवास

$
0
0

rutuja.sawant @timesgroup.com

परळ भागात राहणारी एक सर्वसामान्य मुलगी म्हणजे अक्षया महाडिक... दहावी झाल्यानंतर गिरणगावातल्या महर्षी दयानंद कॉलेजला तिने प्रवेश घेतला. पण त्याच वेळी आपण नोकरी करायची नाही, व्यवसायच करायचा यावर ती ठाम होती आणि त्या दिशेने तिने प्रवास सुरू केला. कॉमर्सची पदवी घेतानाच तिने आयटी ग्रॅज्युएशन डिप्लोमाही केला. या अभ्यासक्रमात अॅनिमेशन, ग्राफिक्स आणि मल्टी मीडिया या विषयांचा समावेश होता. या शिक्षणामुळे तिच्या व्यवसाय करण्याच्या निर्धाराला आणखी बळ मिळालं. काही महिने तिने एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी केली आणि मग आपल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याची तिची धडपड सुरू झाली.

अक्षयाचे कुटुंबीय अगदी साधेसुधे, चारचौघांसारखे होते. त्यामुळे तिच्या व्यवसायाबाबत ते जरा साशंकच होते. मुलीने शिकावं, नोकरी करावी आणि एका चांगल्या घरात लग्न करून जावं, असा साधा सरळ विचार होता त्यांचा. पण अक्षया आपल्या निर्णयावर ठाम राहिली. आई-वडिलांकडून कोणतीही मदत न घेता तिने व्यवसाय सुरू केला. वेबसाइट तयार करणं, लोगो करणं, ही कामं ती करू लागली. यातूनच तिला मोठी कामं यायला लागली. काही मोठ्या ब्रँडसाठीही तिने डिझाइनिंग, प्रिटिंगचं काम केलं आहे. लोअर परळमध्ये तिने आपल्या मॅसिव्ह कनेक्शन कंपनीसाठी ऑफिस घेतलं. वेब डिझाइनिंगसोबत तिने इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही शिरकाव केला आहे. थीमवर आधारीत वाढदिवस, लग्नसोहळे याची ऑर्डर ती घेऊ लागली. आता मॅसिव्ह इव्हेंट, मॅसिव्ह अॅडव्हरटाझिंग आणि मॅसिव्ह मल्टी मीडिया या सिस्टर कंपनी तिने सुरू केल्या आहेत. अक्षयाची घोडदौड वेगाने सुरू झाली आहे. आता तिला कुटुंबियांचीही साथ मिळते आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे अक्षयाला अनेक अडचणींवर मात करण्याचं बळ मिळतं. ती आता एक नवीन संकल्पना राबवणार आहे. लग्नसोहळ्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी एकाच वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचं काम ती सध्या करत आहे. या साइटमुळे लोकांना हॉलपासून वाजंत्री, घोडेवाले, कॅटरर्स, अशा सगळ्यांशी घरबसल्या संपर्क साधणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर लालबाग, परळ महोत्सवाचंही ती आयोजन करणार आहे. वयाच्या पंचव‌शिीत अक्षयाचा गरुड झेप घेण्याचा निर्धार थक्क करणारा आहे. करिअरचा निश्चय पक्का असेल तर दिशा आपोआप मिळते हेच अक्षयाच्या यशाचं गमक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>