Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

त्यालाही लावा कामाला…!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

नव‍ऱ्याने घरच्या कामात मदत करावी, अशी प्रत्येकीची इच्छा असते. नवरोबांना कामाला लावणं काही तितकंसं सोपं नाही. त्यासाठीच हे भन्नाट फंडे...

ऑफिसातून थकून भागून घरी आलं की पसारा आणि कामांची यादी बघून डोकं गरगरतं. अशावेळी आपल्या नव‍‍ऱ्याने आपल्या कामाला हातभार लावावा, अशी अनेकींची इच्छा असते. ती सहजासहजी पूर्ण होणारी नसली तरी काही युक्त्या प्रयुक्त्या लावून तुम्ही ते करून घेऊ शकता. ते कसं?..

मेहनतीची कामं सोपवा - बऱ्याच नवऱ्यांना स्वयंपाकघरातली कामं बायकी वाटतात. अशा वेळी कष्ट, ताकद आणि मेहनतीने करायची कामं त्यांच्याकडे सोपवा. शिडीवर चढून माळ्यावरच्या वस्तू काढणं, ठेवणं, माळा स्वच्छ करणं अशी कामं देता येतील. ट्यूब बल्ब बदलणं, खिळे ठोकणं, शेल्फ बसवणं अशी कामंही तुमचा भार सहज हलका करतील. जड डबे, पिशव्या, पुस्तकं आदी गोष्टी उचलून दुसरीकडे ठेवायच्या असतील तर नवरोबांना जरूर कामाला लावा.

चतुराईने कामाला लावा - त्याला थेट काम सांगता येत नसेल तर आपल्या हाताखाली कामाला घ्या. म्हणजे किराणा सामानाची यादी करणं, कोणत्या वस्तू संपल्या किंवा संपत आल्या याची नोंद ठेवणं किंवा बाथरूम स्वच्छ करणे, लाकडी फर्निचरला पॉलिश करणं, अशा जबाबदा‍ऱ्या तो सहज घेऊ शकतो.

महत्त्व दाखवा - तुमचा नवरा तुमच्या कामाला कमी समजत असेल तर तुम्ही करता ते काम, त्याची व्याप्ती आणि त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट त्याला दाखवून द्या. तुमच्या बोलण्यातून त्याला जाणवेल अशा रीतीने कामाचा उल्लेख करा. यामुळे तो तुमच्या कामाला महत्त्व द्यायला शिकेल.

संपावर जा - तुमच्या कामाचं महत्त्व तुम्ही अनेकदा सांगूनही त्याला कळत नसेल तर मात्र शेवटचा उपाय आहे, संपावर जाणं. घरातली गरजेची कामं काही वेळेपुरती करू नका. घरात चालताना पायाला कचरा लागेल, धुतलेले कपडेच जेव्हा मिळणार नाहीत, तेव्हा त्याला तुमच्या कामाचं महत्त्व आपोआपच कळून येईल आणि तोही तुमचा आदर करू लागले.

एकत्र‌तिपणे करा - एकत्र काम केल्याने ताण कमी होतोच शिवाय त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो. एकमेकांचा सहवास मिळावा म्हणून सिनेमा किंवा हॉटेलिंगच करायला हवं असं नाही. एकत्र स्वयंपाक, शॉपिंग, घराची सफाई किंवा शेल्फची मांडणी केली तरी नात्यातला ताजेपणा टिकून राहायला मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>