'तुला सांगते, ग्रॅज्युएट झालं ना की जो तो विचारतो, काय मग आता कधी ? म्हणजे मी करिअर वगैरे काही करायचं नाही का ?' , सुधा वैतागून मला विचारत होती. तिचा रोख लग्नासंदर्भात होता हे उघड आहे. यंदाचा लग्नाचा सीझन सुरु झालाय. सुधावरून मुलामुलींच्या लग्नाविषयीच्या आणि जोडीदाराविषयीच्या अपेक्षांचा मागोवा घ्यावा असं सहज मनात आलं. लग्नेच्छू मित्र-मैत्रिणींशी बोलल्यावर त्यातल्या काही अपेक्षा समोर आल्या.
या अपेक्षांमध्ये अजूनही मुलं-मुली स्थावर-जंगम आणि नातलग याविषयक अपेक्षांमध्येच अधिक अडकून पडलेले दिसले. तर लव्ह मॅरेज करणारे दुसरंच टोक गाठू पाहत होते. त्यांना फक्त 'हम दोनो' एवढंच दिसत होतं. या अपेक्षांपैकी काही गमतीदार उदाहरणं - मुलगा
* नोकरी करणारी हवी
* समजून घेणारी असावी
* अॅडस्टमेंट करणारी असावी
* नवऱ्यावर विश्वास ठेवणारी असावी
* दौऱ्यावर जाणाऱ्या नवऱ्यावर भरवसा ठेवणारी हवी
* समान व्यवसायामधली नको
* लग्नानंतर दोनच मुलं व्हावीत
* भावंडांतली असावी
* अरेंज्ड मॅरेज असेल तर एकाच जातीची असलेली बरी
मुलगी
* एकुलता एक असावा
* आगाऊ नसावा
* संशयी चालणार नाही
* टुकार जोक करून हसवणारा नसावा
* विचार करणारा पण अगदीच आबाजी नसावा
* कलांची आवड हवी
* स्वतंत्र असावा
* घर असावं पण डोक्यावर कर्जाचा बोजा नको
* फार लायबिलिटीज नसाव्या
* लगेच मूल व्हावं अशी अपेक्षा करणारा नको
दोघांकडून समोर आलेल्या काही नमुनेदार अपेक्षा
* जोडीदार पहिल्यांदाच लग्न करणारा असावा
* जोडीदाराने माझा इतिहास तपासावा, मलाही त्याचा तपासू द्यावा
* मुलाला गाव असावं, गावी घर असावं. म्हणजे गावाचा अनुभव घेता येईल
* सेकंड होम आधीच घेतलेलं नसावं. लग्नानंतर ते दोघांनी मिळून घ्यावं
* मुलगी धूम्रपान न करणारी आणि ड्रिंक्स न घेणारी असावी
* जोडीदार हुशार असावा
* आपापल्या आर्थिक गुंतवणुका वेगळ्या करू देणारा असावा
* जोडीदार शाकाहारी हवा
* होणाऱ्या नवऱ्याकडे कार हवी.
सुपर'फास्ट' अपेक्षा
जोडीदार फास्ट ट्रेनच्या मार्गावरचा असावा! मी कल्याणला किंवा विरारला लहानाची मोठी झालेली आहे. तेव्हा मला स्लो ट्रेनची सवय नाही. म्हणून मग डोंबिवली, ठाणे, बोरिवली, घाटकोपर अशा फास्ट ट्रेन थांबणाऱ्या उपनगरांमध्येच राहणारा असावा. पश्चिम रेल्वेमार्गावर राहणारा असेल तर जोडीदार मध्य रेल्वेमार्गावरचा नकोच! तर मध्य रेल्वेवाले असतील तर त्यांना पश्चिम रेल्वेमार्गावर जाण्यासाठी उत्सुक असतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट