Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

इमोशनल ते प्रोफेशनल!

$
0
0

भावंडं या नात्यानं लहानपणापासून एकत्र केलेली धमाल आणि पुढे जाऊन एकाच क्षेत्रात कार्यरत असलं तर? होय, अशी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यांच्या प्रोफेशनल आणि इमोशनल बाँडिंगविषयी…

मैदानात धोबीपछाड
ज्योतीमध्ये असलेली उत्तम चपळाई पाहून पाचवीपासून मी तिला कबड्डी शिकवू लागलो. पुढे त्या खेळातच तिला गोडी निर्माण झाली. पण ज्योती राज्यस्तरावर खेळून माझं स्वप्न पूर्ण करत आहे. मैदानात आम्ही दोघं एकमेकांना हक्कानं धोबीपछाड देतो.
- उदय डफळे, कबड्डीपटू

अवघड होतं सोपं
अभ्यास असो वा एखादी केस, गरज पडली तर माझ्या डॉक्टर असलेल्या दोन्ही ताईंशी मी चर्चा करतो. त्यानंतर सगळं काही सोपं होतं. अगदी लहानपणी अभ्यास घेण्यापासून ते आता एखाद्या रुग्णाची अवघड केस सोडवण्यापर्यंत सारं काही ताई समजावून सांगतात.
- गजानन रोडगे, डॉक्टर

चढ-उतारांची साक्षीदार
अध्यापनाच्या व्यवसायाकडे वळण्यापूर्वी सिनेसृष्टीत मी संघर्ष करत होतो. त्या चंदेरी दुनियेत वावरताना अनेक चढ-उतार मी अनुभवले आहेत. या सगळ्याला माझी ताई म्हणजेच शर्मिष्ठा ठाकूर साक्षीदार होती. खरं तर शिकवण्याच्या पेशाकडे वळण्यासाठी तिनेच मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ताईच माझं खरं प्रेरणास्थान आहे.
- प्रसाद ठाकूर, प्राध्यापक

धमाल-मस्ती अन् केस स्टडी
कॉलेजमध्ये दोन वर्ष सिनीअर ते आता माधवची मार्गदर्शक हा प्रवास मी आणि तो खूप एन्जॉय करतो. एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे प्रसंगी बॉस आणि प्रसंगी त्याची ताई अशा भूमिका निभावताना खूप मजा येते. सगळी धमालमस्ती आम्ही करतो.
- पूजा थोरात, वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>