चेहरा बऱ्याच गोष्टी न बोलताच सांगतो, असं म्हणतात. मग त्या चेहऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे. चेहरा हा आपला आरसा असतो. तुमच्या चेहऱ्याची ठेवण समोरच्यावर विशेष छाप पाडू शकते. रुप अधिकाधिक खुलवण्यासाठी मेकअप, विविध क्रीम्स यांचा वापर वाढतो. शिवाय ऊन, धुलीकण, धूर, हवेतील कोरडेपणा यामुळेही त्वचेला त्रास होऊ शकतो. म्हणूनच कॅमेऱ्याला सामोर जाताना चेहरा आणि सोबतच त्वचा नीटनेटकी कशी ठेवावी? चेहरा आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलचं बहुमोलाचं मार्गदर्शन 'डॉ. त्वचा'चे संचालक डॉ. अमित कारखानीस यांनी श्रावणक्वीन स्पर्धकांना दिलं. प्रत्येक मुलीला आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी आणि खुलवण्यासाठी त्यांनी मोलाच्या टिप्स दिल्या.
काही महत्त्वाच्या टिप्स
•चेहरा धुण्यासाठी नेहमी फेसवॉशचा वापर करा.
•स्पेशल मॉडिफाइट वॉटर मेकप रिमूव्हरचाच वापर करावा.
•मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात सतत वावर असलेल्यांनी मेकअपसाठी चांगल्या दर्जाच्या गोष्टींचा वापर करा.
•उन्हात बाहेर जाणार असल्यास बाहेर जाण्याच्या किमान २० मिनिट अगोदर सनस्क्रीनचा वापर करावा.
•दिवसातून किमान एक फळ आणि चार-पाच बदाम खाणं अत्यावश्यक आहे.
•आहारात समतोल राखणं आवश्यक आहे.
•बिस्किट्स, कुकीज किंवा कोणताही बेकारीतील पदार्थ खाणं शक्यतो टाळा.
•अंघोळ झाल्यानतर मॉईश्चरायजर लावावं. त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी हे फार उपयुक्त ठरतं.
•सर्व प्रकारचे व्हिटॅमीन मिळतील अशा प्रकारच्या गोष्टी अधिअधिक खाव्यात.
•अॅक्नेचा (मुरूम) त्रास असणाऱ्यांनी व्हिटॅमीन 'ए'ची कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत.
अंतिम फेरीसाठी शुभेच्छा!
अंतिम फेरीतील या वीस जणींनी स्वतःच सौंदर्य छान जपलं आहे. योग्य आहार आणि त्वचेची योग्य काळजी हे त्यांचं सौंदर्य अधिक खुलवेल. या सर्वांना स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा.
- डॉ. अमित कारखानीस, संचालक, डॉ.त्वचा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट