Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

नैवेद्याची गोडी न्यारी

$
0
0

उकडीचे मोदक आणि गणेशोत्सव हे फार जुनं आणि पारंपरिक समीकरण आहे. त्यामुळे नैवेद्यामध्ये मोदकाचं महत्त्व खूप आहे. त्याचसोबत जर आपण नैवेद्यामध्ये अजून स्वादिष्ट मिठाई आणली तर बाप्पा पण खूष आणि घरची मंडळी पण! म्हणूनच मुंटाने आणल्या आहेत तुमच्यासाठी खास नैवेद्य स्पेशल रेसिपीज...

चॉकलेट मार्झिपन
साहित्य- एक वाटी काजू, एक वाटी साखर, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, तीन चमचे कोको पावडर, चार चमचे पाणी, १/२ वाटी डेसिकेटेड कोकोनट, दोन चमचे तूप
कृती- प्रथम मिक्सरमध्ये काजू व आवश्यकतेनुसार पाणी घेऊन पातळ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या. पॅनमध्ये साखर व चार चमचे पाणी घालून मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत साखर वितळवून घ्या. त्यामध्ये काजूची पेस्ट घालून नीट एकजीव करून घ्या. मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहा. ते घट्ट होऊ लागले की, त्यामध्ये कोको पावडर व व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा ढवळत रहा. मिश्रण घट्ट झाल्यावर ते एका बाऊलमध्ये काढून घ्या व हातानेच लहान-लहान गोळे करून घ्या. नंतर ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट करून घ्या. अशाप्रकारे चॉकलेट मार्झिपन तयार!

पनीर बर्फी
साहित्य- २५० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क, १२५ ग्रॅम पनीर, ३-४ वाटी फ्रेश क्रीम, दोन चमचे गुलाबपाणी, ४-५ केशर काड्या, १/२ चमचा वेलचीपूड, एक चमचा तूप, प्रत्येकी १०-१२ पिस्ता व बदाम
कृती- पॅनमध्ये कंडेन्स्ड मिल्क, फ्रेश क्रीम व कीसलेलं पनीर घेऊन मंद आचेवर ढवळत रहा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये केशर व वेलचीपूड घालून पुन्हा ढवळून घ्या. २-३ मिनिटे शिजवून घ्या. नंतर गुलाबपाणी घालून एकजीव करून घ्या. थोडं थंड झाल्यावर मोल्डला तुपाने ग्रीस करून मिश्रण थापून घ्या व वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवून घ्या. थंड झाल्यावर आपल्या आवडत्या आकारात कापून सर्व्ह करा पनीर बर्फी.

काजू बर्फी
साहित्य - २५० ग्रॅम मावा , १ वाटी काजू, १/२ वाटी साखर, १ चमचा तूप, १/४ चमचा वेलचीपूड, १४-१५ काजू, ३-४ केशर काड्या.
कृती- मिक्सरमध्ये काजूची बारीक पावडर करून घ्या. मंद आचेवर पॅन गरम करा. त्यामध्ये तूप गरम करून मावा घाला व सतत ढवळत रहा. मावा वितळायला सुरुवात झाल्यावर त्यामध्ये साखर टाकून मिश्रण पुन्हा ढवळून घ्या. नीट एकजीव करून घ्या. साखर पूर्णपणे विरघळल्यावर त्यामध्ये काजूची पावडर घालून मंद आचेवर मिश्रण एकजीव करून घ्या. त्यामध्ये वेलचीपूड व केशर घालून पुन्हा ढवळा. मिश्रण घट्ट झाल्यावर मोल्डमध्ये तुपाने ग्रीस करून थापून घ्या व थंड झाल्यावर चौकोनी आकारात कापून घ्या. अशाप्रकारे प्रसादासाठी काजू बर्फी तयार!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>