हल्लीच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर अनेक ट्रेंड्स पाहायला मिळतायत आणि तरुणाईसुद्धा हे सगळे ट्रेंड्स अगदी सर्रास फॉलो करताना दिसते. काही दिवसांपूर्वी 'वेअर डीड वी मीट फर्स्ट' असा एक ट्रेंड आला होता. यामध्ये 'वेअर डीड वी मीट फर्स्ट' असं आपल्या टाइमलाइनवर लिहिलं जायचं आणि समोरच्या व्यक्तीने आपली पहिली भेट कुठे झाली ते लिहायचं असतं. हा ट्रेंड खूप फॉलो झाला. त्यानंतर अजून एक ट्रेंड धुमाकूळ घालून गेला तो म्हणजे 'युअर फ्रेंड व्हुज नेम स्टार्टस विथ दिस हॅज टू गिव्ह यू अ पार्टी'. या ट्रेंडनुसार अनेकांनी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून पार्टी उकळली, हे नक्की!
सध्या अजून एक ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय तो म्हणजे' अ मीटिंग बीटवीन द फ्रेंड्स' नावाचा. या ट्रेंडमध्ये समोरची व्यक्ती आपल्या फेसबुक वॉवर एक मजकूर लिहिते. जे फ्रेंड्स तो मजकूर वाचतील त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दल स्मरणात राहिलेली एखादी गोष्ट किंवा जागा किंवा एखादा प्रसंग कमेंटमध्ये लिहायचा असतो. त्यानंतर कमेंट करणाऱ्या व्यक्तीने तोच मजकूर आपल्या वॉलवर शेअर करायचा असतो. हे चक्र असंच चालू रहातं.
हा मजेशीर ट्रेंड सध्या सोशल मीडियावर खूप गाजताना दिसतोय आणि खूप लोक हा ट्रेंड वापरून सोशल मीडियावर एन्जॉय करताना दिसताहेत. पण एखाद्या जवळच्या मित्राने काही कारणास्तव मजकूर वाचलाच नाही आणि कमेंट केली नाही तर या ट्रेंडमुळे गैरसमजसुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फ्रेंड्स असे हे ट्रेंड्स बिंधास्त फॉलो करा, पण कोणत्याही ट्रेंडमुळे कुणाचं मन दुखणार नाही ना याची काळजी घ्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट