विनोदाचा विषय ऑस्ट्रेलियामध्ये करोनाचा रुग्ण सापडला तेव्हापासून हा आकडा वाढतोच आहे. आतापर्यंत ३ लोक मृत्यमुखी पडले आहेत. तर २०० हून अधिक लोक पॉझिटीव्ह असल्याचं कळतंय. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ५०० हून अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांना २ आठवडे घरातच राहण्यास सांगितलं आहे. करोनाचे रुग्ण मुख्यत: मोठ्या शहरात सापडल्यानं इतर शहरांत मात्र सर्वसाधारण वातावरण आहे. त्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम झालेला नाही. मोठ्या मॉल्समध्ये सकाळपासूनच टॉयलेट पेपर खरेदी करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. त्याशिवाय, तांदूळ, ब्रेड आणि औषधं खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे. विमानतळावर काही लोक मास्क लावलेले दिसत असले, तरी मूळचे ऑस्ट्रेलियन तसे बिनधास्त आहेत. सिडनीव्यतिरक्त ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजेस सध्या तरी सुरू आहेत. खबरदारी म्हणून सॅनिटायझर्स वितरित केले जात आहेत. बस, ट्रेन, विमानप्रवास यावर सध्या तरी फारसा परिणाम झालेला दिसत नाही. तरुण मुलं टॉयलेट पेपरवरुन होणाऱ्या भांडणांचे व्हिडीओ एकमेकांना शेअर करत करोनावर विनोद करत आहेत. एकूणच बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या ऑस्ट्रेलियामध्ये भीतीच्या वातावरणाबरोबरच करोना हा कट्ट्यावरचा आणि विनोदाचा विषय झाला आहे. प्राक्तन वडनेरकर, संशोधक, ऑस्ट्रेलिया विद्यापीठं बंद जर्मनीमध्ये लोक खाद्यपदार्थ तसंच इतर गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर साठा करताना दिसताहेत. सुपरमार्केट्स रोजच्या रोज रिकामी होत आहेत. हँडवॉश, सॅनिटायझर्स तसंच बटर, तेल, तांदूळ यांचा तुटवडा भासतोय. लोक बसचालकाकडून तिकिट घ्यायला तयार नाहीत. सोमवारपासून रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्या कमी करण्यात आली आहे. सर्व विद्यापीठं बंद असून, ती २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होतील. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास परवानगी देत आहेत. लोकांचे वेगवेगळे चमू तयार करून त्यांना शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितलं जातंय. रेस्तराँमध्ये खाणं लोकांनी जवळपास बंदच केलंय. म्युनिच, झुरिच, फ्रँकफ्रूटहून जाणारी बहुतेक विमानं रद्द करण्यात आली आहेत. श्वेता जोगळेकर, इंजिनीअरिंग विद्यार्थिनी, जर्मनी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट