नोकरी करणाऱ्या सुनांची आमची ३५/४० वर्षांपूर्वीची पिढी! घर हेच विश्व असणाऱ्या, सून आली की आपला कामाचा भार, जबाबदाऱ्या जरा कमी होतील, अशी सहज, साधी अपेक्षा बाळगणाऱ्या सासवांसाठी, सकाळीच बाहेर पडणारी आणि दिवेलागणीला घरी परत येणारी सून स्वीकारणे ही त्यावेळी खूप मोठी तडजोड होती.
↧