प्रत्येक घराला एक रीत असते, एक
वृत्ती असते, असं
म्हणतात. असं असलं, तरी
घरातल्या माणसांच्या स्वभावाचे प्रकार भिन्न भिन्न असतात. (व्यक्ती तितक्या
प्रकृती या न्यायाने ते योग्यच आहे म्हणा.) या न्यायानं सर्वसाधारणपणे जवळपास
प्रत्येक कुटुंबात अशी एक व्यक्ती असते, जी कायम थोडीशी नाराज
असते. तिला सतत काही तरी खुपत असतं.
↧