प्रेमात पडणं, घरी सांगणं आणि मग लग्न ठरणं याच्यानंतर सध्या आणखी एक स्टेप अॅड झालीय, आपापलं सासर समजून घेणं. विशेषतः मुलींसाठी. लग्न ठरलेल्या अनेकजणी त्यांच्या होणाऱ्या सासरी प्रत्येक कार्यात, कार्यक्रमात हजेरी लावू लागतात. काहीवेळा त्याचं पर्यवसान कायमच घट्ट जवळिकीत होतं, तर काहीवेळा मात्र त्यावर ढवळाढवळीचा शेरा बसतो.
↧