मी आणि माझी मैत्रिण दृष्टी दोघी बीएआरसी क्वार्टर्समध्ये राहायचो. तिची आणि माझी आई तिथेच काम करतात. आमच्या दोघींचे वडीलही एकाच बँकेत काम करत असल्याने आमच्या कुटुंबाची छान ओळख होती. त्यामुळेच आमचीही छान गट्टी जमली. आमच्या दोघींच्या बऱ्याच आवडीनिवडी समान आहेत. पहिली ते दहावी आम्ही एकत्रच शिकलो. नंतर मात्र दोघींनाही वेगवेगळ्या कॉलेजला प्रवेश मिळाला. दहावीनंतर आम्ही दोघी वेगळ्या कॉलेजला जाणार, नेहमीसारखं रोज भेटणार नाही म्हणून दृष्टीने माझ्या त्यावर्षीच्या वाढदिवसाला एक खास भेट दिली होती. ही भेट होती, एक खास पुस्तक. यात तिने फेसबुकवरचे माझे फेसबुकवरचे सगळे फोटो गोळा करून त्यावर छान छान कमेंट दिल्या होत्या. वाढदिवसाची इतकी सुंदर भेट मला यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. दृष्टीच्या कल्पकतेमुळे मी खरंच भारावून गेले. आम्ही आता जरी रोज भेटलो नाही तरी आमची दोस्त कायम आहे. अशी माझी ही दोस्त आणि अशी मैत्री कधीच तुटू नये, हीच देवाकडे प्रार्थना!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट