एखादं नॅशनल पार्क असो, पहिली भेट झाली ते हॉटेल असो, आपल्या बजेटनुसार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एखाद्या संकल्पनेवर ही जोडपी प्रीवेडिंग शूट करून घेतात. त्यासाठी हवी तितकी रक्कम मोजायला ही मंडळी तयार असतात. 'आपली प्रेमकथा इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे त्यातून त्यांना दाखवायचं असतं. शिवाय ती आठवण त्यांना जपून ठेवायची असते', असं फोटोग्राफर तुषार देसाई म्हणतात.
एखाद्या आवडत्या गाण्यावर, ते जिथे शूट झालं तिथे जाऊन अगदी तसंच शूट करून हवं असं सांगणारी अनेक जोडपीही आहेत. अगदी परदेशात जाऊनही शूट करायला ही मंडळी तयार असतात. 'संकल्पना आणि शूटिंगची जागा यानुसार या शूटची किंमत ठरते. मुंबईमध्ये प्री वेडिंग शूट करून घ्यायचं असेल, तर किमान २५ हजार ते थेट एक-दीड लाख रुपये मोजण्याची तयारी हवी. परदेशात शूट करायचं असल्यास दोन ते अडीच लाखांच्या पुढे बजेट जाऊ शकतं', असं फोटोग्राफर विघ्नेश शिंदे म्हणतात. एखादं पंचतारांकित हॉटेल, निवांत बेट, नयनरम्य सागरी किनारा अशाप्रकारची लोकेशन्स प्रीवेडिंग शूटसाठी जोडप्यांना हवं असतं, असं फोटोग्राफर राजेश सावंत सांगतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट