आपला जोडीदार कसा असावा, याबाबत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. काळानुरुप त्या बदलतातही. आजच्या युगातल्या मुलांच्या मनातली 'ती' नेमकी आहे तरी कशी?
आईवडिल म्हणतील, तिच्याशी लग्न आणि संसार... हा काळ आता गेला. मुलामुलींच्या एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. काळानुरुप पुरुषांच्या त्यांच्या पत्नीकडून असलेल्या अपेक्षाही बदलल्या आहेत. सहजीवनातली ही स्वप्नसुंदरी नेमकी कशी असावी, असं त्यांना वाटतंय. एक काळ होता की पुरुषांना अगदी घरेलू मुलगीच बायको म्हणून हवी असायची. पण आता काळ बदलला आणि पुरुषांचा दृष्टीकोनही. मुलींचं नोकरी करणं, त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर काम करणं, अनेक मुलांना आवडतंय. पटतंय. त्यामुळेच मुलांना त्यांची बायको करिअर ओरिएंटेड असावी, असं वाटतं. एका सर्वेक्षणानुसार ८३.५ टक्के पुरुषांना वाटतं की, घरात बसून त्यांची वाट पाहणाऱ्या बायकोपेक्षा बाहेर पडून त्यांच्या बरोबरीने नोकरी करणारी मुलगी त्यांना आवडेल. घरखर्चालाही त्याने हातभार लागेल.
क्रिकेटबद्दल भारतीयांचं प्रेम आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे बहुतांश तरुणांना वाटतं की त्यांच्या गर्लफ्रेंडलाही क्रिकेट आवडावा.
तिने फक्त घर, स्वयंपाक याबद्दल अपडेट राहणं, काहींना मंजूर नाही. त्यांच्यामते, पत्नीनंही रोजच्या बातम्या, करंट अफेअर्स या सगळ्याची माहिती ठेवायला हवी. डेली सोपच्या स्टोरीपेक्षा तिला जगातल्या नव्या गोष्टींची माहिती असेल तर ते जास्त बरं.
बऱ्याच पुरुषांना वाटतं, की बायको आपल्याच ऑफिसमध्ये काम करणारी नकोच. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतात. कारण ऑफिसातले वाद घरात येणं, अशाने सहज शक्य होतं.
बायको फक्त टीव्ही किंवा रिअॅलिटी शो बघणारी नसावी, त्याऐवजी एकमेकांना वेळ देण्यावर तिचा भर असावा, असं ८०टक्के पुरुषांना वाटतं.
फोनवर तासनतास गप्पा मारणारी, आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी, अगदी व्यक्तीगतही मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करणारी जोडीदारीण ७८.२टक्के पुरुषांना नकोय. त्याऐवजी तिने नवऱ्याशी जास्त बोलावं. वाद असतील तर ते एकमेकांतल्या चर्चेने सोडवावे, असं त्यांना वाटतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट