Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

​ बाहुबलीवाली साडी नेसणार?

$
0
0

प्राची आंधळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

सण-उत्सवांमध्ये मुंबापुरीचा जल्लोष हा पाहण्यासारखा असतो. या उत्सवाच्या माहोलात देवसेनासारखी साडी किंवा बाहुबलीसारखे कुर्ते दिसले तर नवल वाटायला नको. कारण ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन, प्रतिष्ठापना आणि मिरवणुकांमध्ये मिरवताना फॅशनेबल कपडे, मेकअप, दागिने याकडेही तरुणाई लक्ष देते. गणपतीच्या दहा दिवसात वेगवेगळ्या स्टाइल्स करण्यासाठी 'मुंटा'कडून या स्पेशल टिप्स खास तुमच्यासाठी...

मराठमोळ्या कपड्यांमध्ये असणाऱ्या इरकली, पेठ, पैठणी तागाच्या कापड्यामधून बनलेले शॉर्ट मिडी ड्रेस यंदा मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

गणपतीचं डिझाईन असलेल्या इम्ब्रॉडरीला यंदा खूप मागणी आहे. त्यामुळे गणपती स्पेशल असे कपडे तुम्हाला हटके लूक देतील.

पैठणी, कांजीवरम, पटोला, जरदोसी, लेहरीया, बांधणी या कापडापासून बनवलेले कुर्ते, स्कर्ट, जॅकेट, पलाझो, गाऊन्स ड्रेस असे फॅशनेबल कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

सणांच्या दिवसामध्ये कम्फर्ट बघून पारंपरिक कपडे घालण्यावर सध्या तरुणाईचा भर असतो. त्यामुळे खादीचे कुर्ते, पायजमा याचाही फॅशनमध्ये उपयोग करु शकता.

आगमन सोहळ्याला बहुतेकजणी नववारी साडी, पैठणी, नारायण पेठ, पेशवाई साडी घालण्यासाठी उत्सुक असतात. त्या साड्यावर कॉन्ट्रास्ट रंगांचे ब्लाउज छान दिसतील. लांब बाह्यांचे किंवा फुग्याचे बाही असलेले ब्लाऊज छान दिसतील. साडीमध्ये बाहुबली साडीला चांगली मागणी आहे.

पारंपरिक साडी घालताना त्यावर दागिने ही पारंपरिक असतील यावर लक्ष द्यावं. कोल्हापुरी साज, मोत्यांचे दागिने अशा प्रकारची ज्वेलरी सध्या मार्केटमध्ये आहे. त्याशिवाय बाजूबंद, कमरपट्टा, पैंजण, बांगड्या, नथ, झुमके असा साजशृंगार सध्या खूप ट्रेंडी आहे. पारंपरिक टेम्पल ज्वेलरी हा सुद्धा उत्तम पर्याय ठरेल.

पावसाळ्याच्या दिवसात एवढे दागिने किंवा भरजरी कपडे घालायचे नसतील तर इंडो वेस्टर्न फ्युजन कपड्यावर भर दिला पाहिजे. स्लिट कुर्ता, जॅकेट कुर्ता, ट्युनिक, पलाझो, डबल कुर्ता, अंगरखा, अनारकली यांचा वापर तुमच्या गणपतीच्या सणामध्ये फ्युजन स्टायलिंगसाठी करू शकता.

गौरी पूजन, विसर्जन मिरवणूक अशा कार्यक्रमांना फ्युजनमधले कपडे ट्रेंडी ठरतील. पांढरा कुर्ता आणि कलरफुल जॅकेट हे सगळ्यात ट्रेंडी लूक देतील. त्याशिवाय कुठल्याही भन्नाट कुर्त्यावर गोल्डन प्रिंटेड पँट घालून ही स्टाइल करू शकता. कपड्यानुसार ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ही छान दिसेल. पण सगळ्याच कपड्यावर चंद्रकोर, मोठी टिकली लावायला विसरू नका.

केसांना सुद्धा हाय पोनी, पफ, वेगवेगळ्या वेण्यांचा वापर करून हटके स्टाइल करू शकता. मोगऱ्याचा गजरा ही हेअरस्टाइलसाठी वापरू शकता.

कपड्यानुसार पायांमध्ये हिल्स किंवा मोजडीचा वापर करा. शिवाय पॉम-पॉमच्या जुती ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. घुंगरू असलेल्या कोल्हापुरी चपलांही खूप मागणी आहे.

मुलांसाठी आगमनाची फॅशन स्टाइल करताना पांढरा कुर्ता, जॅकेट आणि खाली खादी सलवार किंवा पायजमा घालावा. - डोक्यावर टोपी किंवा नारंगी फेटा उठून दिसेल. माथ्यावर चंद्रकोर काढावी. हातात एखादे ब्रेसलेट किंवा घड्याळ, पायात कोल्हापुरी किंवा मोजडी घालावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>