Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गाडी ठेवा कूल

$
0
0

उन्हाळ्यात गाडी थंड करण्याची व्यवस्था म्हणजेच कुलिंग सिस्टिम खूप महत्त्वाची असते. तुमच्या गाडीचं इंजिन सुव्यवस्थित आणि थंड ठेवण्याच्या काही टिप्स...

००००

मुंबई टाइम्स टीम

प्रवाही पदार्थांच्या पातळीकडे लक्ष द्या- गाडीच्या प्रवाही पदार्थांच्या पातळीचं नियंत्रण राखणं खूप महत्त्वाचं ठरतं. विशेषतः उन्हाळ्यात. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा हे करा. थंड असतानाच रॅडिएटरवरची प्रेशर फिलर कॅप काढा. तापमान वाढत जातं तशी गाडीही गरम होऊ लागते. रॅडिएटरवर प्रवाही पदार्थाचा उष्मांक वाढवण्याचा दबाव येतो. पाणी उष्णतेचा उत्तम वाहक आहे; पण पाणी आणि कूलंट याचं मिश्रण योग्य काम करतं. बहुतांशी उत्पादक गाड्यांमध्ये १०० टक्के कूलंट किंवा ५० : ५० मिश्रण सुचवतात.

होजेस झिजू शकतात- इंजिन ब्लॉक, पंप आणि रॅडिएटरला जोडणारा महत्त्वाचा भाग म्हणजे होजेस. कुलिंग सिस्टिमचा हा महत्त्वाचा भाग आहे. रबर पार्ट, जे प्रतिकूल वातावरणाखाली बॉनेटच्या खाली एकत्र जमा होतात आणि ते झिजण्याची सर्वाधिक शक्यता असते. गरम पाण्यामुळे होजेसवर दबाव निर्माण होतो, छोटेसं छिद्र किंवा रबर पार्टमधल्या भेगेमुळे भीषण समस्या उद्भवू शकते. कुलिंग यंत्रणेमधील प्रेशर लॉसमुळे पाण्याचं नुसतं तापमान वाढत नाही, तर यामुळे इंजिन अधिकच गरम होऊ शकतं. गळती होऊ नये याकरिता होजेसची नित्य तपासणी करावी. कोणत्याही प्रकारचा हिरवा थर असेल, तर त्वरित होजेस बदलावेत.

विविध प्रकारच्या कुलिंग यंत्रणा- बहुतांशी अत्याधुनिक गाड्यांमध्ये कूलंट साठवण्याच्या दोन टाक्या असतात. एक म्हणजे रॅडिएटर आणि दुसरा म्हणजे सर्ज टँक किंवा डिगॅसिंग टँक. साधारणपणे ज्या गाड्यांच्या रॅडिएटरवर फिलर कॅप नसते, त्या गाड्यांमध्ये डिगॅसिंग टँक असतो. याच भागावर सर्वाधिक दबाव असतो आणि तो सारखा भरावा लागतो. पूर्वी ज्या गाड्यांचा वापर क्रीडाप्रयोगांच्या उपयोजनाकरता केला जात असे, त्या गाड्यांमध्ये अतिरिक्त टाकी बसवलेली असायची. या वैशिष्टपूर्ण टाकीमुळे अडकलेली हवा किंवा वायूचे बुडबुडे यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळायचा. हॅचबॅक प्रकारातल्या गाड्यांमध्ये अतिरिक्त प्लॅस्टिकची टाकी असते. हाच सर्ज टँक. उच्च दबावाच्या वेळी सर्व प्रवाही पदार्थांना एकत्रित केलं जातं. गाडी खूप गरम झाल्यास चालकानं सर्ज टँक न भरता रॅडिएटर भरावा, ज्यानं गाडीचं तापमान कमी होण्यास मदत होईल.

कुलिंग फॅन- पाण्याच्या पंपाबरोबरच कुलिंग फॅन रॅडिएटरला थंड करू शकतो. फॅन फिरायचा थांबला, तर फ्यूज आणि सोलेनोइड तपासून घ्या. त्यांची झीज झाली आहे का नाही ते पहा. इंजिन सुव्यवस्थित आणि थंड ठेवण्यासाठी कुलिंग फॅन थेट बॅटरीला जोडावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>